fbpx

पैसे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दरवाजा उघडला, रस्त्यांवर नोटांचा पाऊस

टीम महाराष्ट्र देशा : अमेरिकेतील अटलांटामध्ये एखाद्या चित्रपटात दाखविल्याजाते त्या प्रमाणे दृश्य पाहायला मिळाले. पैसे घेऊन निघालेल्या ट्रकचा दरवाजा मध्येच उघडल्याने रस्त्यावर नोटांचा पाऊस झाला. रस्त्यावरनोटा दिसत आल्याने अनेकांनी गाड्या थांबत पैसे गोळा केले. जवळपास 1 लाख 75 हजार डॉलर म्हणजेच सव्वा कोटीच्या नोटा हवेत उडाले असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील जॉर्जियाजवळच्या अटलांटामध्ये मंगळवारी एक ट्रक पैश्यांची वाहतूक करत होता. दरम्यान अचानक ट्रकचा मागील दरवाजा उघडला आणि पैसे हवेत उडू लागले. बऱ्याच नोटा रस्त्यावरही पडल्या. त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांनी हवेत आणि रस्यावर पैसे दिसल्याने गाडी थांबवत पैसे गोळा केला.

दरम्यान या संदर्भात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली असून, जवळपास १५ गाड्या रस्त्यावर थांबल्याचं म्हंटले आहे. जवळपास 1 लाख 75 हजार डॉलर म्हणजेच सव्वा कोटीच्या नोटा हवेत उडाले असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी आणि ट्रकमधील कर्मचाऱ्यांनी अनेक नोटा गोळा केल्या. पण अनेक नोटा गायब आहेत.
इतकेच नव्हे तर गायब झालेल्या पैश्यांची चौकशी केली जाणार आहे. जे लोक नोटा गोळा करुन घरी परतले, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी म्हंटले आहे. तसेच ज्यांच्याकडे नोटा सापडतील त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही म्हंटले आहे.