ट्रकच्या धडकेने पोलिस हवालदाराचा मृत्यू

accident

टीम महाराष्ट्र देशा – भरधाव ट्रकने पोलिस हवालदाराच्या दुचाकीला दिलेल्या धडकेने जखमी झालेल्या हवालदाराचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालक पसार असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नंदकुमार आव्हाळे (रा. तोरणागड हौ. सो. पडेगाव) असे अपघातात मृत्यू पावलेल्या हवालदाराचे नाव आहे. आव्हाळे हे 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पडेगाव येथून कामावर दुचाकीवरून जात असताना औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील छावणीतील रेल्वे पुलावर भरधाव ट्रक क्र. (एम. एच. 43 वाय 6065) या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात आव्हाळे हे गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आव्हाळे यांना जखमी अवस्थेत सोडून ट्रक चालकाने पळ काढला होता. पोलिसांनी आव्हाळेंना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला