मला नवीन घर ,इनोव्हा किंवा स्कॉर्पियो कार द्या, माणिक सरकार यांची सरकारकडे मागणी

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या आधी माणिक सरकार यांची देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी ओळख होती. त्यांची नैतिकता, प्रामाणिकपणाचे कौतुक व्हायचे. मात्र याच माणिक सरकार यांनी सत्ताधारी भाजपाकडे राहण्यासाठी नवीन घर आणि एसयूव्ही कारची मागणी केली आहे. माणिक सरकार यांची हि मागणी सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. माणिक सरकार यांच्या या मागण्यांवर भाजपाने टीका केली आहे.

आगरतला येथे मिनिस्टर क्वार्टर लेनमध्ये तीन नवीन घरे बांधण्यात आली आहेत. तिथे माणिक सरकार यांनी घर मागितले आहे. आपल्याला निवासासाठी घर उपलब्ध करुन द्यावे असे त्यांनी त्रिपुरा विधानसभेच्या सचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. मतदारसंघांना भेटी देण्यासाठी इनोव्हा किंवा स्कॉर्पियो कार देण्याची अजब तोंडी मागणी केली आहे. निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना सरकार यांनी त्यांच्या हातात १५२० रुपये दाखवले होते तर उर्वरित २४१० रुपये बँकेत जमा असल्याचे म्हटले होते.Loading…
Loading...