टीम महाराष्ट्र देशा: TVF ची सर्वांची आवडती सीरिज Tripling (ट्रिपलिंग) पुन्हा एका नवीन सीजन सह प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सुसज्ज आहे. मागील दोन्ही सीजन प्रमाणे या सीजनमध्ये देखील सुमित व्यास, मानवी गाग्रू आणि अमोल पराशर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच नव्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीजन मध्ये तुम्हाला जास्त धमाल, मस्ती आणि नाटक बघायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
या सीजनमध्ये देखील चंदन चितवन आणि चंचल हे तिघ भावंड ट्रीपला जाताना दिसणार आहे. परंतु यावेळी या तिघांची ट्रिप नसून या ट्रिपमध्ये यांचे पालक देखील सामील आहेत. ट्रिपलिंग 3 मध्ये तुम्हाला भरपूर ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या सीझनमध्ये या फॅमिलीच्या कॉमेडी सोबतच इमोशनल सीन सुद्धा दिसणार आहे. ट्रिपलिंग सीजन 3 मध्ये संपूर्ण फॅमिली दर्शकांचे मनोरंजन करणार आहे.
ट्रिपलिंग सीजन 3
तीन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ट्रिपलिंगचे 3 रे सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता खूप वाढलेली आहे. चंदन, चंचल आणि चितवन या सिरीज मधल्या पात्रांना मागील दोन सीझनमध्ये प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले होते.
https://youtu.be/VwK1hmPH_e8
Tripling 3 कधी होणार रिलीज
ट्रिपलिंग सीजन 3 चे दिग्दर्शन नीरज उडवाणी यांनी केले असून या चित्रपटाची कथा tvf चे प्रमुख अरुणाभ कुमार आणि सुमित व्यास यांनी लिहिली आहे. ट्रिपलिंग 3, 21 ऑक्टोबर 2022 रोजी Zee5 वर रिलीज होणार आहे.
फॅमिलीवर आधारित आहे हे सीजन
ट्रिपलिंग सीजन 3 हे कुटुंबावर आधारित आहे. या सीझनमध्ये तीन भावंडासह त्यांचे पालक सुद्धा दिसणार आहे. त्याचबरोबर ही सिरीज भरपूर फॅमिली ड्रामाने परिपूर्ण असणार आहे.