राज्यातील कोरोनाबाधितांवर त्रिसूत्री उपचार पद्धती : राजेश टोपे

Rajesh-Tope-1

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 135 झाली आहे. काल, पुणे 1, सांगली 3, कोल्हापूर 1, नागपूर 5 असे 10 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.आतापर्यंत एकूण 19 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.यामध्ये मुंबई 12,पुणे 5,औरंगाबाद 1, नागपूर 1 असा तपशील आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू रहाणे आवश्यक आहेत. गरोदर महिला,लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

ट्विट करत त्यांनी राज्यातील कोरोना ग्रस्तांच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत आहे. राज्यात सध्या १३५ बाधीत रुग्ण आहेत. तर आतपर्यंत ४२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या असून त्यापैकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर १३५ पॉझीटिव्ह आले. शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स,कर्माचारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. तर अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्यशासन विचाराधीन असल्याचेही यावेळी त्यांनी म्हंटले आहे.

त्याचप्रमाणे, संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये, हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत.ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे कोरोनाबधीत रुग्ण बरे होत आहेत.

तसेच बाधीत रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसींग नंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे.नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन यावेळी राजेश टोपे यांनी केले आहे.