आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश

मुंबई : आयपीएलच्या धामधुमीत भारतीय महिला कुस्तीपटूंनी आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यात टोकीयो ऑलम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विनेश फोगाट आणि अंशु मलिक यांनी या स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे. तर अनुभवी साक्षी मलिक मात्र रौप्य पदक पटकावु शकली.

५२ किलो वजनी गटातील महिलांच्या झालेल्या अंतिम सामन्यात विनेशने चायनीज तैपईच्या मेंड सुआन-सेईवर ६-० असा विजय मिळवला. यापुर्वी विनेशने आशियाई स्पर्धेत तीन वेळा रौप्य पदक कमावले होते. अंतिम सामन्यात एकही गुण न गमावता सुवर्णपदक पटकावले. तर हरीयाणाच्या १९ वर्षिय अंशुने ५७ किलो वजनी गटात झालेल्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या बत्सेस अटसेगला ३-० असे नमवले. या सामन्यात बत्सेतला विविध चुकांसाठी पंचांनी तीन वेळा ताकीद दिली होती. मात्र तरीही तिचा खेळ न सुधारल्यामुळे अंशूला विजयी घोषित करण्यात आले.

तर उपांत्य फेरीत तांत्रिक गुणांच्या आधारे अंशूने क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या सेव्हारा एशमुराटोव्हाला पराभूत केले. तर दिव्याने महिलांच्या ७२ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या झामिला बर्गेनोव्हावर ८-५ अशी मात केली. दिव्याचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. गतवर्षी दिव्याने ६८ किलो वजनी गटात अजिंक्यपद मिळवले होते. या स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकुण सात पदके पटकावली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP