fbpx

तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची चिन्हं

टीम महाराष्ट्र देशा- केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला नोटीस जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी न केल्यामुळे या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून दिलेला दर्जा का काढू नये? अशी विचारणा आयोगानं केली असून यावर ५ ऑगस्ट पर्यंत उत्तर मागवलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला किमान चार राज्यांमध्ये कमीत कमी सहा टक्के मतं मिळणं अनिवार्य आहे. किंवा लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान तीन राज्यांमध्ये कमीत कमी दोन टक्के जागा मिळणं बंधनकारक आहे. किंवा कमीत कमी चार राज्यांमध्ये पक्षाला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळायला हवा.