पश्चिम बंगाल पोटनिवडणूकीत तृणमूल काँग्रेसची बाजी

MAMATA

टीम महाराष्ट्र देशा: तृणमूल काँग्रेसच्या सुनिल सिंग यांनी पश्चिम बंगाल मधिल नोपारा विधानसभा पोटनिवडणूकीत एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. तर भाजपा च्या उमेदवाराने आश्चर्यकारकरीत्या दुसरे स्थान मिळवले.

तृणमूल काँग्रेसच्या सुनिल सिंग यांनी १,०१,७२० मते मिळवत ६३,००० मतांनी हि निवडणूक जिंकली. भाजपाच्या संदिप बंडोपाध्याय यांना ३८००० पेक्षा जास्त मते मिळाली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ऊमेदवाराची ३५,००० मते मिळवत तिसऱ्या स्थानी घसरण झाली. या पोटनिवडणूकीतील विजयाने ममता बँनर्जींची ताकद वाढली आहे. यातून पश्चिम बंगालमधे त्यांना त्यांच्या पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यास नक्कीच मदत होईल.

या विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयी ऊमेदवार सुनिल सिंग यांच्याबरोबर विजयोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना सुनिल सिंग यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसला रामराम केलेल्या मुकुल रॉय यांच्यावर सडकून टिका केली. ते म्हणाले की, मुकुल रॉय यांच्या भाजपा मधे जाण्याने आम्हाला कोणताही फरक पडला नाही. मुकुल रॉय यांना यापुढे राजकारणात कोणतेही भविष्य नाही.