रावसाहेब दानवेंची विष्णु सावरांना जिवंतपणी श्रद्धांजली

टीम महाराष्ट्र देशा: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा एकदा घसरले. मंगळवारी पालघर येथील जाहीर सभेमध्ये दानवेंकडून घोर चूक झाली. त्यांनी खासदार चिंतामण वनगा यांच्याऐवजी स्थानिक आमदार विष्णू सावरा यांचे निधन झाल्याचा उल्लेख केला.

रावसाहेब दानवे यांना बराचवेळ आपली चूक लक्षात आली नाही. त्यांनी भाषण तसेच समोर लांबवले. भाषण चालू असताना दानवे म्हणाले, ‘सावरा कुटुंबीय तिकडे गेले म्हणून भाजपाचे नुकसान होणार नाही’ यावेळी मात्र त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर दानवे गडबडले आणि थातूरमातूर स्पष्टीकरण दिले. मात्र हा प्रकार उपस्थित नागरिक, सारमाध्यमांच्या लक्षात आला. त्यामुळे रावसाहेब दानावेंची चांगलीच गल्लत झाली.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

यापूर्वी देखील रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर “गावातील कार्यकर्त्याला इथे बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! सांगून भाजप मेळाव्याला गर्दी जमवा”, असे अजब सल्ले रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी रावसाहेब दानवे यांना चांगलेच ट्रोल केले होते.

दिवंगत चिंतामण वनगा यांचे निधन झाले तेव्हापासून भाजपने आपला कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याचे वनगा कुटुंब म्हणाले होते. यावर यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी वनगा कुटुंबीय भाजपाचे नुकसान करणार नाहीत, असे म्हटले होते. मात्र वनगा कुटुंबाने मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सोमवारी शिवसेनेकडून त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीही देण्यात आली.

Shivjal