माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

नागपूर : विधान परिषदेत माजी कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सभागृह नेते तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत शोक प्रस्ताव सादर केला. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या शोक प्रस्तावात दिवंगत फुंडकर यांचे कार्य सविस्तर विशद करुन भावपूर्ण आदरांजली वाहिली. दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचा विधिमंडळाचा उत्तम अनुभव हा मार्गदर्शक असून त्यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणाचे पुस्तक लवकरच विधिमंडळामार्फत प्रकाशित केले जाईल, असे सांगितले.

Loading...

पाटील आपल्या शोक प्रस्तावात म्हणाले, दिवंगत भाऊसाहेब फुंडकर हे शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठविणारे नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्यावर व कृषी खात्यावर मोठा आघात झाला आहे. पाटील म्हणाले, दिवंगत फुंडकर हे समन्वय साधणारे नेते होते. अलिकडेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीप्रकरणी त्यांनी अनेक महत्वाचे पर्याय सुचविले होते. त्यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव मिळावा म्हणून खामगाव ते नागपूर पदयात्रा काढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटले होते. शेतकऱ्यांचा एक सच्चा साथी निघून गेल्याचे दु:ख आहे, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, भाऊसाहेबांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्यांचे मित्र होते. एक अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपल्याचे दु:ख आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, शेतकऱ्यांच्या उसाला आणि कापसाला हमीभाव मिळावा, म्हणून भाऊसाहेबांनी सातत्याने प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लोकसभेमध्ये आणि विधानमंडळात त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांची बाजू मांडली.

यावेळी उपसभापती माणिकराव ठाकरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, रामहरी रुपनवर, जयंत पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, अनिल सोले, हेमंत टकले, सुरेश धस, हरिभाऊ राठोड, गोपीकिशन बाजोरिया, प्रकाश गजभिये यांनीही शोकभावना व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली.

शेतकऱ्यांवर होतं असलेल्या अन्यायाविरोधात एकत्र या – रघुनाथदादा पाटील

अन्यथा शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील- खासदार राजू शेट्टी

भाजपने २०१९ मध्ये फटका बसेल म्हणून तोडली पीडीपीशी युती- आठवले

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...