चव्हाण, विक्रम काळे यांनी केली आदिवासी आयुक्त कार्यालयाची मागणी

औरंगाबाद : औरंगाबादेत आदिवासी आयुक्त कार्यालय सुरु करण्याची मागणी आमदार विक्रम काळे तसेच आमदार सतिष चव्हाण यांनी आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे  लेखी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.  निवेदनामध्ये त्यांनी सांगितले की,  औरंगाबाद हा विभाग भौगलिक दृष्या राज्यात खुप मोठा आहे. या मध्ये ८ जिल्हे, ७८ तालुकांचा समावेश आहे.

तसेच येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, विधी विद्यापीठ, विभागीय आयुक्त कार्यालय, जलसंधारणाचे आयुक्त कार्यालय आहे. शैक्षणिक तसेच औद्यौगिक दृष्टीकोनातून औरंगाबाद महसूल विभागात औरंगाबाद हे प्रमुख केंद्र आहे. तसेच औरंगाबाद विभाग हा आदिवासी विकास विभागासाठी ३५० किलोमिटर दुर असलेल्या अमरावती आदिवासी आयुक्त कार्यालयाला जोडला आहे.

अश्या या कारणामुळे या भागात सुरु असलेल्या शाळेतील संस्थाचालक तसेच शिक्षक, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. हे आयुक्त कार्यालय दुर असल्याने याचा शैक्षणिक विकासावर याचा खुप परिणाम झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर आदिवासी विकासाला तसेच शिक्षणाला जालना देण्याच्या हेतूने औरंगाबाद येथे आदिवासी आयुक्त कार्यालय सुरु करण्याबाबत तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदार विक्रम काळे, सतिष चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या