fbpx

चीनविरोधात ट्विटरवर ट्रेण्ड ;  #BoycottChina आणि #BoycottChineseProducts द्वारे निषेध

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तान मधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावात नकाराधिकाराचा वापर करत चीनने पाकिस्तानची आणि दहशवादाची साथ दिली आहे. त्यामुळे चीन विरोधात देशात संतापाची लाट उसळली आहे. याचा परिणाम म्हणून चीनी वस्तूंचा निषेध करत चीनला धडा कसा शिकवता येईल याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या ट्विटवर BoycottChina आणि #BoycottChineseProducts चा ट्रेंड सुरु आहे.

 

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठीच्या प्रस्तावाची मुदत १३ मार्चला संपणार होती. १० हून अधिक देशांनी या प्रस्तावात भारताची साथ दिली. परंतु चीनने मात्र यात भारताची साथ दिली नाही.

अशाप्रकारे दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी आता भारताकडून प्रयत्न केले जाणार हे नक्की. ट्विटवर  #BoycottChina आणि #BoycottChineseProducts या दोन हॅशटॅगचा वापर करत भारतीयांनी चीनी वस्तूंच्या वापरावर बंदी घालावी असे आवाहन केले आहे.

1 Comment

Click here to post a comment