‘ट्रेंड कायम !’ पुण्यात आजही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा अधिक – महापौर

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम दिसून आला होता. एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. आज पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा २ हजारांच्या आत आला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शहरात नव्याने १ हजार ८३६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, कोरोनामुक्तांचा आकडा आजही नव्या बाधितांपेक्षा अधिक आहे. यामुळे महापौर मोहोळ यांनी ‘ट्रेंड कायम’ असं देखील नमूद केलं आहे. आज ३ हजार ३१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबतच, १८ एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम आहे, असा दावा देखील मोहोळ यांनी केला आहे. मात्र, अजूनही धोका कायम असून योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP