मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड; सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई : शिवसेना सत्तेवर आल्यानंतर कारडेपोला देण्यात आलेली स्थगिती हा विषय ताजा असताना आता पुन्हा मेट्रोसाठी ५०८ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. आरे येथील मेट्रो कारशेडसाठी झाडांचा बळी दिल्यानंतर आता मेट्रो स्टेशन आणि मार्गात येणाऱ्या तब्बल 508 झाडांना हटवण्यात येणार.

याचा प्रस्ताव शुक्रवारी पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. यात यात 162 झाडे मुळापासून कापण्यात येणार असून 346 झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत. आता ; सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर ते ओशिवरा नाल्यादरम्यान मेट्रो- २ अ प्रकल्पाच्या बांधकामाआड येणारी ३२ झाडे कापणे. ९० झाडांचे पुनर्रोपण करणे. गोरेगाव पश्चिमेकडे याच प्रकल्पासाठी गोरेगाव व बांगूरनगर स्थानकांच्या बांधकामात आडवी येणारी २९ झाडे कापणे व ८५ झाडांचे पुनर्रोपण करणे. याच प्रकल्पाच्या कांदिवली पश्चिम येथील लालजीपाडा ते महावीर नगरदरम्यानची ५३ झाडे कापणे व २१ झाडांचे पनर्रोपण करणे.

दरम्यान, दहिसर पूर्व ते डी.एन. नगर दरम्यान ६४ झाडे कापणे व ३७ झाडांचे पुनर्रोपण करणे. लिंक रोड ते चारकोप कारडेपो, अथर्व कॉलेजजवळ मालाड पश्चिमेकडील ११ झाडे कापणे. ८६ झाडांचे पुनर्रोपण करणे, याबाबतचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.