परभणी जिल्हा परिषद कोविड सेंटरमधील तिसर्‍या मजल्यावरही उपचार सुरु

परभणी : जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेले कोविड सेंटरमधील पहिले दोन मजले रुग्णांनी फूल झाल्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रुग्णांच्या व्यवस्थेसाठीच्या हालचालींनी शनिवारी दुपारी वेग घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

पाच मजल्यांच्या असलेल्या या इमारतीत 500 खाटापर्यंत व्यवस्था करण्यात येऊ शकत असल्यानेच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हा परिषदेची नूतन इमारत कोविड सेंटरसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या होत्या. आरोग्य विभागाने 26 मार्च रोजी पहिल्या दोन मजल्यावर कोविड सेंटर सुरू केले. ;यात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी 100 रुग्णांची व्यवस्था येथे केली होती. मात्र, सद्यस्थितीत येथे 230 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. काही दिवसात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव जिल्ह्यात खुप वाढत आहे. रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या व्यवस्थेसाठी नियोजन करणे सुरू केले आहे.

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील तिसरा मजलाही ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागास शनिवारी दिल्या आहेत.सकाळपासूनच तिसऱ्या मजल्यावर बेड टाकण्यासह कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी – कर्मचारी प्रयत्न करत होते. दरम्यान, या इमारतीत सातत्याने ऑक्सीजनसह अन्य सुविधा उपलब्ध असल्याने येथे 80 रुग्णांना ऑक्सीजन लावलेले आहे. तर 20 रुग्णांची प्रकृती सुधारत आहेत. त्यांना ठराविक वेळेनंतर ऑक्सीजन दिले जात आहे. तिसऱ्या मजल्यावर 50 रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे समजते.

ते सर्व रुग्ण येथे निगराणीखाली ठेवण्यात येणार आहेत. इमारतीचा तिसरा मजलाही आरोग्य विभागाने ताब्यात घेतला. त्या तुलनेत येथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तोकड्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येथे रुग्णसेवा सुरू आहे. स्टाफसह अन्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता येथे आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या