तरुणाच्या पोटात सापडला खजिना ; २६३ नाणी, १० ते १२ शेव्हिंग ब्लेड, काचेचे तुकडे, लोखंडी साखळी

टीम महाराष्ट्र देशा – मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील सोहावल येथे राहणाऱ्या मकसूद या तरुणाला शनिवारी (१८ नोव्हेंबर) रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या तीन महिन्यांपासून त्याला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्याची तपासणी सुरु करण्यात आली आणि शुक्रवारी ऑपरेशन करण्यात आलं

ऑपरेशन नंतर सर्वाना आश्चर्य चकित करणार एक प्रकार समोर आला. आणि सर्वाना धक्काच बसला.  डॉक्टरांच्या एका टीमने ३२ वर्षीय  मकसूदच्या  पोटातून २६३ नाणी, १० ते १२ शेव्हिंग ब्लेड, काचेचे तुकडे, लोखंडी साखळीशिवायही अनेक गोष्टी बाहेर काढल्या आहेत. रिवामधील संजय गांधी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी मकसूदच्या  पोटातून नाणी, खिळे आणि चेन काढले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून या तरुणावर उपचार सुरु होते. सतनामध्ये सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी त्याला टीबी झाल्याचं म्हणत उपचार सुरु होता. मात्र, परिस्थितीत सुधार होत नसल्याने रिवा मेडिकल कॉलेजमध्ये त्याला आणण्यात आलं. यानंतर तपासणीत हा प्रकार समोर आल्याची माहिती रुग्णाच्या नातवाईकांनी दिली आहे.

या तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुलाला धातूच्या वस्तू खाण्याची सवय लागली होती. त्यामुळे तो धातूसदृश्य वस्तू खात असे. लहानपणापासूनच तो लपून-छपून नाणी आणि इतर लोखंडी वस्तू खात असे.

 

 

You might also like
Comments
Loading...