आज साधे पत्र लिहिणेही देशद्रोह ठरत आहे : फ्रान्सिस दिब्रिटो

टीम महाराष्ट्र देशा- विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे शत्रू हे लोकशाहीचे शत्रू असतात असं मत उस्मानाबाद इथल्या नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल ज्येष्ठ कवी ना.धो महानोर यांच्या हस्ते त्यांचा औरंगाबाद इथं सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तुमच्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. विचार माणसाला मुक्त करतो. त्यामुळे अनेकांना विचार करणाऱ्यांची भीती वाटत आली आहे. आज साधे पत्र लिहिणेही देशद्रोह ठरत आहे. मुलांनाही आई-वडिलांना पत्र लिहू नका, असे सांगावेसे वाटते असं ते म्हणाले.

दरम्यान, दिब्रिटो यांच्या १५ पुस्तकं आणि पाच अनुवादित पुस्तकांवर साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे आणि प्राध्यापक जयदेव डोळे यांनी भाष्य केलं. मराठीचे पाईक असणारे फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून महामंडळानं परिवर्तनाचं मोठ काम केल्याचं महानोर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या