fbpx

पुलवामा दहशतवादी हल्ला : देशात व्यापाऱ्यांकडून शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून देशव्यापी बंदची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सबंध देशातून निषेध व्यक्त केला जात आहे. या आत्मघातकी हल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहीद झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे सामाजिक स्तरातून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. तर भारताच्या नागरिकांकडून बदला घ्या अशी मागणी होत आहे. तसेच आज सबंध देशात व्यापाऱ्यांकडून या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून देशव्यापी बंदची घोषणा केली गेली. या बंदच्या घोषणेला अनेक राज्यांनी सहभाग दर्शविला.

दरम्यान व्यापारी महासंघातर्फे ठिकठिकाण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. तसेच व्यापारी वर्गाकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत जमा करण्यात येणार असून ही मदत थेट त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे. अशी माहिती महासंघाचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे. या बंद मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पंजाब, तसेच जम्मू काश्मीरसह अनेक राज्य सहभागी होते.

गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले.गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.