Share

Travel Guide | भारतातील ‘हि’ ठिकाणे देतील युरोप ट्रिपचा अनुभव

टीम महाराष्ट्र देशा: आयुष्यात एकदा तरी फॉरेन ट्रीप करणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातले स्वप्न असते. जगभरातील पर्यटकांना युरोपमध्ये फिरायला आवडते. पण काही लोकांना वेळेमुळे तर काहींना बजेटमुळे युरोप ट्रीप शक्य होत नाही. पण तुम्ही जर युरोप ट्रीप प्लॅन करत असला आणि बुजेटमुळे तुम्ही ती कॅन्सल करण्याचा विचार करत असाल, तर तो विचार बाजूला ठेवून ही बातमी वाचा. कारण या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत जिथे भेट दिल्यावर तुम्हाला युरोपचा अनुभव येईल.

भारतामध्ये युरोप चा अनुभव देणारी ठिकाणं

काश्मीर

धरतीवरील स्वर्ग अशी ओळख असलेले काश्मीर हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. काश्मीर हे एक निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण असून तिथे गेल्यावर तुम्हाला युरोपचा फिल येईल. काश्मीर मधील ट्यूलिप गार्डन, दाल लेक मुख्य आकर्षण आहे. त्याचबरोबर काश्मीरमधील श्रीनगर, गुलमर्ग, पहालगाम, सोनमर्ग इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. तुम्हाला जर काश्मीर मध्ये युरोपचा अनुभव घ्यायचा असेल तर काश्मीरला हिवाळ्यात भेट द्या. कारण काश्मीरमधील बर्फवृष्टी युरोपचा अनुभव देते.

नाशिक

महाराष्ट्र राज्यातील नाशिक हे एक पवित्र आणि धार्मिक स्थळ आहे. नाशिक शहराला श्रद्धेचे ठिकाण देखील म्हणतात. शिर्डी, सोमेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, सुंदरनारायण मंदिर आणि पंचवटी ही मुख्य आकर्षण आहे. नाशिक हे एक निसर्ग सौंदर्य आणि नटलेले शहर असून येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला युरोपचा अनुभव देईल.

लक्षद्वीप

भारतामध्ये स्थित असलेले लक्षद्वीप बेट, फ्रेंच पॉलिनेशियासारखे दिसते. जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे फ्रेंच पॉलिनेशियाला भेट देणे जमले नाही तर तुम्ही लक्षद्वीपला भेट देऊ शकता. कारण लक्षद्वीप मध्ये असलेले निसर्ग सौंदर्य तुम्हाला फ्रेंचचा अनुभव देईल.

फॉन्टेनहॉस (गोवा)

गोव्याला भारतातील युरोप म्हणून ओळखले जाते. कारण गोव्यातील संस्कृती, घरे युरोपीय देशाशी जुळून येतात. फॉन्टेनहॉस शहरातील घरे विशेषता युरोपियन संस्कृती सारखे आहेत.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आयुष्यात एकदा तरी फॉरेन ट्रीप करणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातले स्वप्न असते. जगभरातील पर्यटकांना युरोपमध्ये फिरायला आवडते. पण …

पुढे वाचा

Travel

Join WhatsApp

Join Now