Share

Travel Guide | ऋषिकेश ला फिरायला जाण्याचा प्लान करत आहात? तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

टीम महाराष्ट्र देशा: फिरायला जाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण सुट्ट्यांची वाट बघत असतात. आणि आता लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे फिरायचा कुठे जायचे याचे प्लॅन्स आता सगळीकडे सुरू असेल. यामध्ये तुम्ही जर उत्तराखंडच्या सहलीचे नियोजन करत असाल तर त्यामध्ये प्रामुख्याने ऋषिकेश शहराचा समावेश होतो. कारण ऋषिकेश हे एक भारतातील प्रेक्षणीय पर्यटन  स्थळ आहे. ऋषिकेश मधली आश्रम, मंदिर, प्रार्थना स्थळे लोकांना आपल्याकडे वेधून घेतात. त्याचबरोबर ऋषिकेशला ‘योगा कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ असेही म्हणतात. ऋषिकेश शहरातून वाहणारी नदी, हिरवीगार दृश्य, बर्फाचे पर्वत या सगळ्या गोष्टी पर्यटकांना आपल्याकडे ओढून घेतात. त्याचबरोबर ऋषिकेश मध्ये अनेक ॲडवेंचर्स करण्यासारखे आहे. त्याबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

गंगा आरती

ऋषिकेश शहरातील गंगा आरती ही जगभरात प्रसिद्ध आहे. ऋषिकेश मधील त्रिवेणी घाटावर ही महाआरती प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकते. गंगाकाठीवर निर्माण झालेले हे पवित्र वातावरण कुणालाही मंत्रमुग्ध करण्यासाठी पुरेसे असते. त्याचबरोबर ऋषिकेश हे केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनेत्री आणि गंगोत्री अशा चारधाम यात्रेचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते.

योगा केंद्र

ऋषिकेश शहराला योग राजधानी असे देखील म्हटले जाते. जगामध्ये ऋषिकेशची ‘योग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळख आहे. योगा करण्यासाठी किंवा योगासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ऋषिकेश हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही ऋषिकेश शहरांमध्ये स्थित असलेल्या योगा केंद्रांना भेट दिलीच पाहिजे. संपूर्ण उत्तराखंड योग आणि आयुर्वेदाची भूमी म्हटले जाते आणि त्यामध्ये ऋषिकेश विशेष आकर्षण आहे.

ॲडवेंचर्स गेम

योगा आणि गंगा आरती सोबतच ऋषिकेश मध्ये अनेक ॲडवेंचर्स स्पोर्ट्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने बंजी जंपिंग, रिव्हर्स सायकल कॅम्पिंग, रॅपलिंग, हायकिंग इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. ट्रेकिंग प्रेमी साठी ऋषिकेश मध्ये स्पेशल वॉटर फॉल ट्रेकिंग आहे.

व्हाईट रिव्हर राफ्टिंग

तुम्ही ऋषिकेश शहराला भेट द्यायला गेला आणि तिथे जाऊन तुम्ही रिव्हर राफ्टिंग केली नाही तर तुमची ऋषिकेश ट्रिप अपूर्ण राहिली असे मानता येईल. ऋषिकेश मधील व्हाईट रिवर राफ्टींग हेअर ऋषिकेश चे मुख्य आकर्षण आहे. ऋषिकेश मध्ये तुम्ही 16 किलोमीटर पर्यंत रिवर राफ्टिंग करू शकता.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: फिरायला जाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण सुट्ट्यांची वाट बघत असतात. आणि आता लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. …

पुढे वाचा

Travel

Join WhatsApp

Join Now