एसटी कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम आज संपणार

एसटी कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम आज संपणार

Anil Parab

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee Strike) आज कामावर हजर राहण्याचं जे अल्टीमेटम दिलं होतं ते संपतंय. एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही शुक्रवार म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा स्पष्ट इशारा अनिल परब यांनी गुरुवारी दिला होता. त्यामुळे आता एसटी कर्मचारी सरकारचं अल्टीमेटम मानून कामावर हजर होणार की नाही, याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

राज्य सरकारने बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांची ऐतिहासिक अशी पगारवाढ जाहीर केली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेत असल्याची देखील घोषणा केली. मात्र तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. आता या पुढील आंदोलनाचे नेतृत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadawarte) यांनी आपल्या हाती घेत, विलीनीकरणापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.

मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आता कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे. आम्ही शुक्रवारी सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा इशारा यावेळी अनिल परब यांनी दिला. जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तुटेपर्यंत ताणू नये. त्यानंतर जोडता येणार नाही, असा इशाराही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: