एसटी कामगारांचा पगारवाढ तर केला मात्र तरीही…

एसटी कामगारांचा पगारवाढ तर केला मात्र तरीही…

Anil Parab

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab), एसटीचे अधिकारी, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर मूळ वेतनात वाढ करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले आहे.

विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साधारण ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे परब यांनी सांगितले. याशिवाय वेळेवर वेतन, प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासनही शासनाने दिले. मात्र या पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. महिन्याला ६० कोटी रुपये इतका भार राज्य सरकारच्या तिजोरीवर येणार आहे.

राज्यसरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असला तरी देखील एसटी कामगारांच्या पगारवाढीवर सरकारने निर्णय घेतला आहे. असे असले तरी देखील एसटी कामगारांच्या संघटनांना समाधान झालेले दिसत नाही. या संघटना विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून गुरुवारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या: