राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीत; मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

cm fadanvis

मुबंई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागून साबंधीतावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली.

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद मराठीत न झाल्यामुळे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील कारवाईची मागणी केली. तसेच प्रकारानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे सतर्क झाले आणि त्यांनी विधानसभेच्या नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: मराठी अनुवाद केला. पण तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. या गोंधळातच राज्यपालांचं भाषण सुरु होतं.

Loading...

या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली. राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार कसा भोंगळ चालला आहे याचे हे उदाहरण असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी राज्यपालांची भेटही घेतली.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू