fbpx

‘महाराष्ट्र देशा’च्या पाठपुराव्याला यश; तृतीयपंथीयांना मिळणार फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश

sonali dalvi transgender & phoenix mall

पुणे: पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये तृतीयपंथी असणाऱ्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारला गेल्याची चीड आणणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर ‘महाराष्ट्र देशा’ने प्रथम सर्व वास्तव पुढे आणले होते. अखेर मॉल व्यवस्थापणाने आपली चूक कबूल करत यापुढे कोणत्याही तृतीयपंथीयांला प्रवेश नाकारणार नसल्याचे सांगितले.

तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार 

दरम्यान, मॉल प्रशासन इतर तृतीयपंथीयांच्या आधीच्या वाईट अनुभवामुळे आम्ही सोनाली यांना प्रवेश नाकारल्याचे सांगितले, मात्र आता प्रसारमाध्यमे आणि अनेक संस्थांच्या दबावामुळे मॉल आपली चूक मान्य करत आहे. पण जोपर्यंत ते लिखित स्वरुपात आमच्या समुहाची माफी मागत नाहीत तसेच यापुढे कोणत्याही तृतीयपंथी अथवा इतर स्त्री-पुरुषांना केवळ त्यांचे कपडे, राहणीमान आणि लिंगभेदावरून प्रवेश नाकारणार नाही हे लिहून देत नाहीत तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याच सोनाली यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले आहे

काय आहे प्रकरण

एमबीए फायनान्समध्ये उच्च शिक्षित असणाऱ्या तसेच ‘आशिर्वाद’ सामाजिक संस्थेसाठी काम करणाऱ्या सोनाली दळवी या नगररोडवर असणाऱ्या फिनिक्स मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेल्या, मात्र दरवाज्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी केवळ तृतीयपंथी आहे म्हणून त्यांना प्रवेश नाकारला. हाच व्हिडीओ तृतीयपंथी समूहासाठी काम करणारे शाम कोंनूर यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

या घटनेबद्दल बोलताना सोनाली दळवी म्हणाल्या की, मी आणि माझा मित्र फिनिक्स मॉलमध्ये गुढीपाडवा खरेदीसाठी गेलो होतो, त्यावेळी सिक्युरिटी तपासणीसाठी मी महिला सुरक्षा रक्षकाकडे गेले, मात्र त्यांनी माझी तपासणी करण्यास नकार दिला. तसेच दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला बोलावून घेतले. पण त्यांनी ‘आम्ही तृतीयपंथीना प्रवेश देत नसल्याचे सांगितले’, यावर मी अनेकवेळा मॉलमध्ये आल्याचे सांगितले. तरीही त्यांनी मला प्रवेश दिला नाही.

नेमकं काय घडल phoenix मॉलमध्ये व्हिडियो

 सुप्रिया सुळेंचे ट्विट

फिनिक्स मॉल विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन
शहरातील सर्वात मोठ्या फिमिक्स मॉल व्यवस्थापनाकडून सोनाली यांना दिल्या गेलेल्या वागणुकी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मॉलबाहेर आंदोलन करण्यात आले.

एका बाजूला ज्या महाराष्ट्रामध्ये एक तृतीयपंथी सरपंच बनतो. कोणी पोलीस अधिकारी तर कोणी सामाजिक कार्य करत समाजात प्रबोधनाचे काम करत आहेत. मात्र दुसरीकडे पुण्यासारख्या पुरोगामी शहरात घडलेली घटना नक्कीच विचार करायला लावणारी आहे. त्यामुळे आज जरी एका सोनालीला तिचा अधिकार मिळाला असला तरी अशा हजारो सोनाली समाजामध्ये आपल्या अधिकारासाठी झगडत आहेत.