fbpx

हीच खरी लोकशाही;तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान

tarangfal११

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजप पुरस्कृत तृतीयपंथ ज्ञानदेव कांबळे यांच्या बाजूने ग्रामस्थांनी कौल दिल्याने दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली.दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे 4 हजार ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान झालं होतं.

tarangfal१

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत तृतीयपंथी उमेदवार ज्ञानदेव कांबळे यांचा 137 मतांनी सरपंच पदी विजय झाला.अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच पदासाठी भाजप पुरस्कृत पॅनल मधून तृतीयपंथी ज्ञानदेव कांबळे यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चे जयसिंग साळवे या उमेदवाराचा कांबळे यांनी पराभव केला.तरंगफळ गावात त्यांची जल्लोषात मिरवणुक काढली. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत प्रथमच एक तृतीयपंथी सरपंच झाला आहे.

 

 

 

4 Comments

Click here to post a comment