fbpx

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला येथे ट्रान्सफार्मर भवन

chaggan-bhujbal

येवला: येवला मतदार संघातील रोहित्र जळाल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर सुस्थितीमधील नवीन रोहित्र उपलब्ध होण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येवला येथे ट्रान्सफार्मर भवन मंजूर केल्याची माहिती छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील रोहित्र जळाले किंवा नादुरुस्त झाले तर त्याठिकाणी नवीन सुस्थितीमधील रोहित्र लवकर बसविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ट्रान्सफार्मर भवन उभारण्याचा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला आहे. येवला येथे ट्रान्सफार्मर भवन उभारण्यासाठी छगन भुजबळ यांनी ऊर्जामंत्र्यांशी पत्रव्यवहार केलेला होता. त्यामुळे येवला येथे ट्रान्सफार्मर भवन बांधण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून या कामाचे कार्यारंभ आदेश सुद्धा काढण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

 सदर ट्रान्सफार्मर भवनासाठी सुमारे ५२.३५ लक्ष खर्च येणार आहे. येवला मतदारसंघातील ग्राहकांना अखंडित व नियमित वीजपुरवठा मिळावा यासाठी छगन भुजबळ हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. येवला तालुक्यात रोहित्र जळाले किंवा नादुरुस्त झाले तर ते जमा करण्यासाठी आणि नवीन रोहित्रासाठी मनमाड-चांदवड-नाशिकला जावे लागत असे. मात्र आता येवला येथे ट्रान्सफार्मर भवन होत असल्यामुळे नादुरुस्त रोहीत्रांची ने-आण करण्याच्या कालावधीमध्ये बचत होवून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी व महिलांना विशेषतः वीजेअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. येवला येथे उभारण्यात येणाऱ्या या ट्रान्सफार्मर भवनाचे बांधकाम झाल्यानंतर येथे अद्ययावत तंत्रज्ञान व मशिनरी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येवल्यातील वीजेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे बाळासाहेब लोखंडे यांनी सांगितले आहे.

2 Comments

Click here to post a comment