आयपीएस नवटकेंची अखेर तडकाफडकी बदली,वादग्रस्त वक्तव्य भोवले

बीड : माजलगावच्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. जातीवाचक वक्तव्य त्यांना भोवले असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. माजलगावहून त्यांची संभाजीनगर येथे बदली करण्यात आली असून गेवराईचे पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्याकडे माजलगावचा पदभार देण्यात आला आहे.

“अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील 21 व्यक्तींना फोडून काढले आहे,” असे धक्कादायक वक्तव्य या अधिकाऱ्याने केले आहे. नवटके यांच्या बेताल वक्तव्याची एक व्हिडीओ क्लीप वायरल झाली आहे. या वक्तव्याचे निषेध व्यक्त करण्यात येतोय. या प्रकारामुळे IPS अधिकारी आणि माजलगावच्या डीवायएसपी असलेल्या भाग्यश्री नवटके यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे.

औरंगाबाद महापालिकाचे नवे आयुक्त निपुण विनायक