अहमदाबाद :मोदी सरकारने जाहीर केलेल्या सशस्त्र दलातील भरतीसंबंधी अग्निपथ योजनेला (Agnipath scheme) देशभरातून तीव्र टोकाचा विरोध होत आहे. देशभरातील अनेक राज्यांतून विध्यार्थ्यांकडून अग्निपथ योजनेला विरोध होत आहे. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करत आहेत. बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. तरुणांनी तोडफोड, जाळपोळ केली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर योगगुरू बाबा रामदेव (baba ramdev) यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
योजनेला विरोध करण्यासाठी देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान केलं. मात्र या योजनेला लष्करासह अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे. बाबा रामदेव यांनीही अग्निपथ योजनेला पाठिंबा दिला आहे. अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांना बाबा रामदेव यांनी देशद्रोही म्हटलं आहे.
अग्निपथ ही योजना भारत सरकारने विचारपूर्वकच केली असेल. यात देशाचं आणि सैन्याचं हित होणार आहे. मग योजनेविरोधात हिंसा आणि आंदोलन का होत आहे? होणारी हिंसा आणि आंदोलन त्वरित थांबवण्यात आली आहे, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. योजनेला विरोध करणारे असे लोक महात्मा गांधींजींच्या अहिंसेच्या देशाच्या नागरिक नाहीत. ते देशद्रोही आहेत. कारण ते आमच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करत आहे, असं म्हणत बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारच्या योजनेचं समर्थन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :