Aditya Thackeray। नाशिक : सध्या राज्यभर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी सुहास कांदे यांचं आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. मी त्यांना निश्चित भेटेन. ते मातोश्रीवरही भेटायला आले तरी चालेल, दरवाजे उघडेच आहेत. मी काळाराम मंदिरात नेहमीच येतो. आताही दर्शनासाठी आलो. आता आपण मंदिरात आहोत. त्यामुळे इथे राजकारण नको, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यानंतर आदित्य ठाकरे मनमाडला आले. यावेळी मनमाड मेळाव्यात बोलताना त्यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही कांदे यांच्यावर पलटवार केला आहे. मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, गद्दारी का केली? ही लोकांची भावना आहे. गद्दारांनी ते पाहावी, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे. मनमाड येथे शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी सुहास कांदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, याआधी सुहास कांदे माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, आदित्य ठाकरे आणि ठाकरे घराण्याबद्दलही आदर आहे. पण माझे आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे आदित्य यांनी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर द्यावीत. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पर्यटन खात्याचा निधी का दिला नाही? पर्यटन खात्याचा एक प्रकल्प नांदगावमध्ये दाखवा. तसेच त्यांनी जर माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब त्याच मिनिटाला राजीनामा देतो. मी परत निवडणूक लढवतो, असं आव्हानच त्यांनी ठाकरे यांना दिल होत.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray : कधीच कोणासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते – आदित्य ठाकरे
- Alcohol addiction | मद्य शौकिनांनो सावधान!; दारूमुळे तरुणांवर होणारे ‘हे’ दुष्परिणाम वाचा
- Dr.Bharti Pawar। द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली हा आमच्यासाठी सोनेरी क्षण – भारती पवार
- Amruta Fadnavis | “जिलेबी कितीही आडवळणी असो…; अमृता फडणवीस यांच्या देवेंद्र यांना अनोख्या शुभेच्छा
- Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सुहास कांदेंचं चॅलेंज स्वीकारलं, म्हणाले…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<