‘देशद्रोही फक्त याच देशात नाही’; कंगनाचा ‘थलायवी’ चित्रपट पाकिस्तानात ट्रेंड

kangna

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला तिच्या ‘थलायवी’ चित्रपटासाठी खूप प्रशंसा मिळवत आहे. प्रत्येकजण या चित्रपटासाठी कंगनाचे कौतुक करत आहे. चित्रपटात कंगनाने जय ललिताची भूमिका साकारली होती, जी तिने चमकदार आणि उत्तम प्रकारे साकारली होती. या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही, परंतु हा चित्रपट सोशल मीडियावरही ट्रेंड झाला. मात्र या चित्रपटाचा पाकिस्तानमधील अनेकांनी निषेध केला आहे.

हा चित्रपट वाईट असल्याचे अनेक पाकिस्तानी लोकांचे म्हणणे आहे. काल रविवारपासून पाकिस्तानात ट्वीटरवर ‘थलायवी’ चित्रपटाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर पाकिस्तानातील नेटफ्लिक्सच्या टॉप 10 चित्रपटांची यादी शेअर केली. यात ‘थलायवी’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसत आहे. कंगनाने याचे काही स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, “हसण्याखेळण्यात एक गोष्ट ऐकून फार दिलासा मिळाली की, देशद्रोही हे फक्त याच देशात नाही,” असे तिने म्हटले.

‘थलायवी’ हा चित्रपट जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसचे संकट असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्याचाही तारीख पुढे ढकलली गेली. अखेर हा चित्रपट 10 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला. या चित्रपटात कंगनासह दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसले आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘थलायवी’ या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत हिने जयललिता यांची भूमिका साकारली आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ए.एल.विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून शैलेश सिंग आणि विष्णू इंदुरी निर्माते आहेत. जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट काल प्रदर्शित करण्यात आला. आता कंगना लवकरच ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या