सणांच्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या खिशाला कात्री; तिकिटाच्या दरात दुपट्टीने वाढ

Railway

टीम महाराष्ट्र देशा : ऐन सणांच्या दिवसांमध्ये प्रवाशांसाठी वाईट बातमी आहे. दिवाळी आणि गणेशोत्सव या दोन्हीही सणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी आपल्या गावी जात असतात. तसेच कामानिमित्त मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये असणारे नागरिक गावाकडे जाण्यासाठी हे दोन सण निवडतात.

सणाच्या निमित्ताने प्रवास महागला आहे. ट्रेन आणि विमानाच्या तिकिटाच्या दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. यामुळे नियमित धावणाऱ्या ट्रेन बुक झाल्याअसून जादा ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. त्याचे दर वाढले आहेत. एवढंच काय तर विमान प्रवास देखील महागला आहे.

सणांच्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दिल्ली-वाराणसी या मार्गावर चालणारे वंदे भारत ट्रेनमध्ये तिकिट उपलब्ध नाही. वेटिंग तिकिट घेण्याचा विचार करत असाल तर एसी चेअर तिकिट 1755 रुपये आहे.

दरम्यान, एक्झिक्यूटीव क्लास 3300 रुपये तिकिट आहे. तेजस ट्रेनच्या एसीचे तिकिट हे 1550 रुपये असून एक्झिक्युटिव क्लास करता 4435 रुपये आकारले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या