मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘रक्षाबंधन’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट (August) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रक्षाबंधन’या चित्रपटामध्ये रिलेशनशिप मध्ये अडकलेल्या अक्षय कुमारची संपूर्ण कहाणी दाखवण्यात आली आहे.
अक्षय कुमारने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं आणि आता लगेच चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये बहीण-भावांमध्ये असणाऱ्या प्रेमाविषयी कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अक्षयच्या गर्लफ्रेंडची भूमिका भूमी पेडणेकर साकारताना दिसत आहे.
‘रक्षाबंधन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहेत. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर आधारित आहे.
महत्वाच्या बातम्या :