‘कॉल ड्रॉप’ झाल्यास कंपन्यांना भरावा लागेल दंड

वेबटीम:- कॉल ड्रॉपच्या च्या मुद्द्यावर TRAI ने मोबाईल कंपन्यांना चांगलाच दनका दिला आहे. लागोपाठ ३ महिने नियम मोडल्यास कंपन्यांना १० लाखांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली. नियम पायदळी तुडवणाऱ्या कंपन्यांकडून एक ते पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याचा सध्या प्रस्ताव आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांकडून कॉल ड्रॉप झाल्यास दंडाच्या रकमेत दीडपटीने वाढ करण्यात येणार आहे. सलग तीन महिने कॉल ड्रॉप झाल्यास त्यानंतर दंडाची रक्कम तिसऱ्या महिन्यात दुपटीने वाढेल.

‘कॉल ड्रॉप’ म्हणजे काय ?

दोन व्यक्तिनमधे बोलताना जर काही कारणास्त्व म्हणजे नेटवर्क प्रॉब्लम मुळे जर कॉल कट झाला तर त्या प्रकरणाला ‘कॉल ड्रॉप’ अस म्हणतात.

हे नियम मोडल्यास मोबाईल कंपन्याना ट्राय च्या नियमावलीचा दंड भरावा लागेल

व्यस्त दिवसांमध्ये जवळपास ९० टक्के मोबाईल टॉवरवरील कॉल ड्रॉपचे प्रमाण ३%पेक्षा अधिक नसावे

एकूण कालावधीच्या ९० टक्के काळात ९८ टक्के कॉल्स सुरळीत होणे गरजेचे आहे.

एका सर्कलमधे एकूण कॉल्सपैकी २% पेक्षा अधिक कॉल्स ड्रॉप झाल्यास कंपनीकडून दंड आकारला जाऊ शकतो.