केरळ (कोझिकोड) : तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सहाना हिचा आज वाढदिवसाच्या दिवशीच करुण मृत्यू झाला आहे. १३ मे ला या सहानाचा राहत्या घरी मृतदेह आढळला. ती केरळमधल्या कोझिकोड जिल्ह्यातील परम्बील बाजार या ठिकाणी राहत होती. खिडकीच्या रेलींगला लटकलेल्या अवस्थेत सहानाचा मृतदेह आढळला.
याबाबत पोलिसांनी तपास चालू केला आहे. पोलिसांनी सहानाचा पती सज्जाद याला ताब्यात घेतल आहे. सहानाचे आईवडील बोलतात की ही हत्या आहे, आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तिचा पती तिला रोज मारहाण करायचा, तिचा छळ करायचा अशी माहिती सहानाच्या आईने पोलिसांना दिली. माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी देखील तिच्या आईने पोलिसांकडे केली आहे.
सहानाचा पती काहीच काम करत नव्हता. त्यामुळे त्या दोघांमध्ये पैशावरून नेहमी वाद व्हायचे. सहानाच्या आईवडिलांनी तिचा पती सज्जाद याच्यावर शारीरिक आणि भावनिक छळाचा आरोप केला आहे. सज्जाद आणि सहानाने मागच्या दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते.
मार्शल आर्ट्स प्रशिक्षक जॉली बास्टीयन दिग्दर्शित ‘लॉक डाऊन’ या चित्रपटात तिने काम केल आहे. पण तो चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. याचबरोबर सहानाने अनेक दागिन्यांच्या जाहिरातीमध्ये देखील काम केल आहे.
महत्त्वाच्या बातम्या :