गायक महेश काळे यांच्या वडिलांचे दु:खद निधन

महेश काळे

मुंबई : मराठी संगीत क्षेत्रातील अत्यंत गाजलेले शास्त्रीय गायक महेश काळे यांचे नाव कमी कालावधीत प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांच्या गाण्याने रसिक प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध होतात. मात्र नुकतेच त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. महेश काळे यांचे वडील मुकुंद काळे यांचे काल पुणे येथे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.

दरम्यान महेश काळे यांनी सोशल मिडीयावर एक भावूक पोस्ट शेअर करत ‘मिस यू बाबा’ असे लिहिले आहे. तसेच पुढे ते म्हणाले, जे बरे होऊ शकत नाही, ते सहन करावे लागते. आयुष्यभर मला एक वेदना सहन करावी लागणार आहे, अशी भावूक पोस्ट करत वडीलांनसोबतचा फोटो महेश काळे यांनी शेअर केला आहे.

मुकुंद काळे यांनी महाराष्ट्र बँकेत वरीष्ठ अधिकारी म्हणूनही काम केले आहे. गेली ३० वर्षे ते गोंदवले येथे अन्नदान गृहात पौर्णिमा व महोत्सवाच्या काळात सेवेकरी म्हणून काम पाहत होते. काही दिवसापूर्वी त्यांची तब्येत खालवली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP