भारताला पहिला ‘ऑस्कर’ मिळवून देणाऱ्या भानू अथैय्या यांचे दुःखद निधन

bhau athayaa

मुंबई : कोल्हापूर कलानगरीत जन्मलेल्या व वेषभूषेसाठी भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथैय्या यांचे दुःखद निधन झाले. गांधीजींच्या वेषभूषेसाठी भानू अथैय्या यांना ऑस्कर पुरस्काराने गौरव करण्यात आले होते. त्यांच्या अचानक जाण्याने कलानगरीतील एक अनमोल मोती निखळला.

एकोणीसशे साठच्या दशकात टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘ईव्ह्ज वीकली’मधील भानू यांची रेखाटने पाहून अभिनेत्री नरगिस प्रभावित झाल्या होत्या. नरगिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या ‘श्री ४२०’ च्या वेशभूषेचे काम मिळाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

गुरुदत्त यांचा ‘साहिब,बीबी और गुलाम’ देव आनंद यांचा ‘गाईड’, ‘आम्रपाली’, शम्मी कपूर यांचा ‘ब्रम्हचारी’, शाहरूख खान यांचा ‘ओम् शांती ओम्’ इ. हिंदी चित्रपटांतून वेषभूषेचे काम करता करता त्यांना रिचर्ड अ‍ॅटेनबरोच्या ‘गांधी’साठी काम करण्याची संधी मिळाली आणि या चित्रपटातील गांधीजींच्या वेषभूषेसाठी भानू अथैय्या यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले.

जोम मोलो यांच्याबरोबर विभागून हे पारितोषिक मिळाले होते. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत. तसेच ‘लगान’, ‘स्वदेश’ यासारख्या चित्रपटांमधील कलाकारांच्या वेषभूषा त्यांनी समर्पकपणे साकारल्या. भानू यांनी अमोल पालेकरांच्या ‘महर्षी कर्वे’ या मराठी चित्रपटासाठीही वेषभूषा केली होती.

महत्वाच्या बातम्या:-