देशात कोळसा तुडवडा ही अफवाच; निर्मला सितारामन यांचं वक्तव्य

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोळसा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वीज संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. भारतासह जागतिक पातळीवर हे संकट आहे. भविष्यात पारंपारिक ऊर्जास्रोत कमी होत जाणार आहेत. त्यामुळे सरकारने अपारंपारिक ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, देशात कोळशाच्या कमतरतेमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची भीती असताना केंद्र सरकारने कोळशाची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनीही कोळसा संकट ही अफवा असल्याचं सांगितलं आहे.

देशात कोळशाची कमतरता नाही, भारत एक पॉवर सरप्लस देश आहे, असे सितारामन यांनी अमेरिकेच्या हॉवर्ड कॅनेडी स्कूलमध्ये बोलताना याबाबत माहिती दिली. हॉवर्ड येथील प्राध्यापक लॉरेंस समर्स यांनी भारतातील कोळशाच्या कमतरतेबाबत प्रश्न विचारल होता. त्यावेळी, उत्तर देताना निर्मला सितारमण यांनी ही माहिती दिली. ‘देशात कोळशाचा पुरवठा सुरू आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाचा पुरेसा साठा असेल’, अशी माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली होती.

ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे. तर, कोळसा पुरवठ्याची साखळीही अखंडीत सुरू आहे. देशातील वीजनिर्मित्ती सक्षम आणि परिपूर्ण असून भारत सरप्लस देश आहे, असेही सितारामन यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या