वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण पडेल महागात

खास वायफाय कॅमेरा आला. . .

 

वेबटीम मुंबई  : वाहतुकीचा नियम मोडूनही कारवाई करण्यास आलेल्या वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालण हे आपल्याकडे रूढ होत चालल आहे . मात्र , आता वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालताना यापुढे थोडा विचार करावा लागणारे . कारण लवकरच मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय कॅमेरा लावण्यात येणार आहे. यंत्रणेत पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नेहमीच्या वॉकी-टॉकी आणि लवाजमाशिवाय पोलिसांना आता हा वायफाय कॅमेराही सोबत बाळगावा लागणार आहे. या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहन चालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि पुढे त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल.

त्यामुळे एखादा व्यक्ती पोलिसांशी जे काही संभाषण किंवा अरेरावी करेल ती सगळी रेकॉर्ड होऊन कंट्रोल रुमला जाईल. कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. सुरुवातीला शहरात 100 कॅमेऱ्यांची चाचणी घेतली जाणार आहे. या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ क्लिप एडिट करता येणार नाहीये  जेणेकरुन छेडछाडीची शक्यता कमी असणार आहे

 

 

You might also like
Comments
Loading...