fbpx

सोलापुरी पोलिसांचा दणका,सुप्रिया सुळेंच्या वाहनावर दंडात्मक कारवाई

सोलापूर : डफरीन चौकातील एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर सोलापूर शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.

सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ‘संवाद ताईंशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे ज्या गाडीत आल्या होत्या. त्या गाडीसह ताफ्यातील सर्व गाड्यांवर वाहुतकीला अडथळा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. डफरीन चौक हा रहदारीचा भाग आहे. मात्र रस्त्यालगत असलेल्या सभागृहामुळे रस्त्यावर ताफा उभा करण्यात आला होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताफा रस्त्यावरून हलवण्याच्या सूचना केल्या.मात्र त्यानंतरही ताफा न हलल्याने ताफ्यातील सर्व ८ गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि इतर एकूण ११ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजकांनी, कार्यकर्त्यांनी वाहन पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक होते. सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. नो पार्किंग परिसरात वाहतूकीला अडथळा होत असल्याने ११  वाहनांवर नियमाप्रमाणे दोनशे रुपये कारवाई केली आहे..