fbpx

पालखीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत ‘असे’ असतील बदल

टीम महाराष्ट्र देशा : संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीनिमीत्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर / उपनगरे व गावोगावाहून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणा-या असंख्य भाविक व वारक-यांचे वाहतुकीसाठी नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही बस वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे.

भावीक वारक-यांच्या सोयीसाठी दिनाक २२/०६/२०१५ पासून दिनांक २६/०६/२०१९ पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणान्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकूण ११२ बसेस संचलनात राहणार आहेत.

दिनांक २५/०६/२०११ रोजी रात्रौ १२.00 वा. पर्यंत आळंदी करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणा-या बसेस व जादा बसेस अशा एकुण २९ बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा ९ बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. दिनांक २६/०६/२०१६ रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून जादा २८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणा-या बसेस सकाळी ५.३० वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ९५ बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनाचे नियोजन आहे. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल.

पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस म्हणजेच दिनांक २८/०६/२०१८ रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत थांबणार असल्याने अशा वेळेस म.गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तद्नंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर / उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल.

हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णतः बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी / भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गाची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा ६६ जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरम्यान, उपरोक्त बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भावीक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.