आर्थिक कोंडीमुळे व्यापाऱ्यांना विजबिल माफी देण्यात यावी – जिल्हा व्यापारी महासंघ

औरंगाबाद : सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापा-यांची आर्थिक कोंडी झाली असल्याने व्यापा-यांना विजबिल माफी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा व्यापारी महासंघातर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, व्यापा-यांनी सातत्याने आर्थिक पॅकेज मिळावे यासाठी प्रयत्न केले. परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे वीज बिलातील शासनाकडे जमा होणारी रक्कम माफ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

वीजबिलातील स्थिर आकार घरगुतीसाठी १०० रुपये व वाणिज्य ४०३ रूपये औद्योगिक ४५४ रूपये प्रति महिना इलेक्ट्रिसिटी ड्युटीचे सर्व पैसे शासन दरबारी जमा होतात ते माफ करण्यात यावे उदा.घरगुती १६ टक्के वाणिज्य २१ टक्के औद्योगिक ९.२ टक्के एकुण विज वापर आकारावी. वीज बिलातील या गोष्टी पूर्णपणे पुढील सहा महिन्यासाठी माफ करण्यात याव्या, असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, तनसुख झांबड, सरदार हरी सिंग, गुलाम हक्कानी, जयंत देवळानकर व अन्य व्यापारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

IMP