उस्मानाबाद : मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एका अडत व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या व्यापाऱ्याने आत्महत्तेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली आहे. दत्तात्रय गुंड असं या 32 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव असून, त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरात सातत्याने घसरण होत आहे. हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे तर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातीलच आपण एक आहोत, असं या व्यापाऱ्याने या चिठठीत म्हटलं आहे.

Loading...

तसेच या चिठ्ठीत दत्तात्रय गुंड यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत की, ”सर्व व्यापारी आणि शेतकरी तुम्हाला चोर दिसतात. म्हणून तर त्या दोघांत भांडणे लावून आपण पाहत बसला आहात. आतापर्यंत व्यापार्यांनीच तारल्यामुळे शेतकरी जिवंत होता. नुकतेच जीवन चालू झाले होते. तुमच्या सरकारी धोरणाने आणि दुष्काळाने ते संपवलं आहे. आपल्या धोरणामुळे हा शेतकरी कायमचा संपावर जात आहे. आणखी कितीजण याच वाटेने जाणार, याची वाट पाहू नका. निर्णयात बदल करुन शेतकरी आणि व्यापारी दोन्ही जगवा,” असं गुंड यांनी म्हंटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने