नगर नियोजन विभाग ‘होपलेस’ नितीन गडकरींची मुख्यमंत्र्यांच्या खात्यावरच टीका

नितीन गडकरी

शहरांचे नियोजन करण्यासाठी असणारे नगर विकास खाते हे फुकटाला महाग असून या सारखे ‘होपलेस’ आणि ‘भुक्कड’ संस्था मी अद्याप पाहिली नसल्याची खरमरीत टीका केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नगर विकास खात्यावर केली आहे. दरम्यान बाहेरची संस्था नेमून पुण्याचा विकास करा असा सल्लाही गडकरी यांनी दिला आहे.

पुणे शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना रोखण्यासाठी नियोजित दुमजली उड्डाणपूलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे गडकरी म्हणाले, वाहतूक समस्येबाबत पुणे हे ज्वालामुखीच्या तोंडावर असून त्याच्या जोडीला प्रदूषणाची मोठी समस्या पुण्याला भेडसावत आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान या कार्यक्रमाला माजी कृषिमंत्री शरद पवार आणि गडकरी हे एकाच व्यासपीठावर आले होते.