ताजमहाल नव्हे तर यूपीतील गोशाळा पाहणार पर्यटक.

ताजमहाल जगातील ७ आश्चर्यापैकी एक असून प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे. देशविदेशातून पर्यटक ताजमहाला भेट देतात. पण उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटक विभागाच्या पुस्तकात मात्र ताजमहाल ला  स्थान देण्यात आले नाही.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अगदी काही दिवसापूर्वी ताजमहाल हे आपल्यासाठी इतर वास्तूप्रमाणेच आहे. असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कदाचित त्या माहिती पुस्तकात ताजमहाल या पर्यटन  स्थळाचा समावेश करण्यात आला नसावा.असे बोलले जात आहे. या पर्यटन स्थळ माहिती पुस्तकात गोरख धाम मंदिरासाठी दोन पाने देण्यात आली आहेत. या विषयी उत्तर प्रदेश सरकारने  असे स्पष्टीकरण दिले आहे की आम्ही अशा पर्यटनस्थळाचा समावेश केला आहे जे अधिक पर्यटकांना माहित नाहीत. नवीन पर्यटक स्थळांचा विकास करण्यासाठी आम्ही ही माहिती पुस्तिका काढली आहे आणि त्यामुळे ताजमहालचा समावेश नाही केला .सर्वत्र या विषयी चर्चा सुरु आहे.