आंबोलीत लवकरच पर्यटन पोलीस ठाणे

two-offiecres-from-nashik-police-get-president-medal

टीम महाराष्ट्र देशा –  आंबोलीतल्या वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर आंबोलीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पर्यटन केंद्र असल्याने माथेरानच्या धर्तीवर पर्यटन पोलीस ठाणे उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सावंतवाडी येथे पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सांगलीच्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी कसून तपास सुरु असून सरकारी पक्षाचे वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांच्या नेमणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना बडतर्फ करण्यात आले असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे, असे ते म्हणालेLoading…
Loading...