चार कुत्र्यांना जिवंत जाळले,16 कुत्र्यांवर विषप्रयोग

पुणे :सुसंस्कृत पुण्यात माणुसकीला अक्षरशः काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. चार भटक्या कुत्र्यांना पकडून जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात घडला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे .

काही दिवसांपुर्वी आंध्रप्रदेशातील एका शहरात कुत्र्याच्या लहान पिल्ल्यांना जिवंत जाळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने याची देशभरात चर्चा झाली होती. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील बाणेर परिसरातून उघडकीस आला. बाणेरमधील पॅनकार्ड रोडवरील एका वस्तीमध्ये चार भटक्या कुत्र्यांना जिवंत जाळल्याची तर 16 कुत्र्यांवर विषप्रयोग करुन त्यांना ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने यासंबंधीची बातमी दिली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर एएसीटी इंडिया या एनजीओच्या काही सभासदांनी घटनास्थळी केलेल्या तपासात कुत्र्यांच्या मृतदेहाचे जळालेले अवशेष आणि कुजलेल्या अवस्थेतील कुत्र्यांचे मृतदेह सापडले आहेत.

You might also like
Comments
Loading...