लग्नाचे अमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार

crime

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित तरुणाने मुंबईतील एका परिचारिकेवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार २०१८ ते ३१ ऑगस्ट या काळात औरंगाबाद येथील बजाज नगर, वानखेडेनगर आणि पुणे येथे घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राजेश प्रेमानंद पवार(वय २८, रा. १०२, बजाज नगर) असे अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव असून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत एका रुग्णालयात परिचारिका असलेल्या तरुणीसोबत राजेश पवार याची ओळख झाल्यावर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे त्याचे अगोदरच लग्न झालेले होते. मात्र, पीडित परिचारिकेपासून त्याने ही बाब लपवून ठेवली होती. २०१८ पासून त्याने वानखेडे नगर, बजाजनगर आणि पुणे येथे तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पीडितेला त्याचे लग्न पूर्वीच झाल्याचे समजताच त्यांच्यात वाद झाला. तेव्हा पवारने पीडितेला शिवीगाळ व बेदम मारहाण केली. जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी पीडित परिचारीकेचया तक्रारीवरून राजेश पवार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या