तिरप्या बसच्या चालकाचा तोराच न्यारा; पाहा थरार! जखमी बाईकस्वार व्हिडिओत कैद

औरंगाबाद : खुलताबाद रोडवरील शरणापूर फाट्याजवळ बिघडलेल्या एसटीने एका दुचाकीधारकाला धडक दिल्याची घटना काल घडली. खुलताबाद रस्त्यावर वेगाने निघालेली बस तिरप्या चालीने अतिशय वेगात रस्ता कापत होती. आधी ज्याला धक्का लागला त्यानेच व्हिडिओ शुट केला. त्यामुळेच हा थरार उघड झाला. धुळे आगाराच्या या बसने‌ खुलताबाद रोडवर अनेकांना धक्का दिल्याची चर्चा यावेळी रंगली होती. ही बस आगारातून काढताना चालकाने बस न तपासताच पुढे नेली त्यामुळे बस मध्ये बिघाड असल्याचे लक्षात आलेच नाही, असे स्पष्टीकरण महामंडळातर्फे देण्यात आले.

सोमवारी दुपारी खुलताबाद रोडवर वेगात निघालेली बस चर्चेचा विषय ठरली होती. या बसचा धक्का एका दुचाकीधारकाला लागला. मात्र तो थोडक्यात बचावला. बसमध्ये काहीतरी समस्या असल्याचे लक्षात आले. आणि त्याने व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी या व्हिडिओमध्ये सदर बस चालकाने आणखी एका दुचाकीला धक्का दिल्याचे कैद झाले आहे. धुळ्याची ही बस तीरप्या चालीने पुढे निघाली होती. या पार्श्वभूमीवर आगार प्रमुख सुनिल शिंदे यांनी सांगितले, बस आगारातून बाहेर काढण्यापूर्वी ती सुस्थितीत आहे कि नाही हे पाहूनच चालक-वाहकाने बस आगाराबाहेर काढावी. असा नियम आहे.

बस निघण्यापूर्वी चालकांना सुरक्षित बस चालवण्याबाबत तसेच बसमध्ये बिघाड आहे की नाही हे पाहणे याबाबतही सूचना केल्या जातात. मात्र सदर बस चालकाने या सूचनांकडे दुर्लक्ष करत बसची तपासणी न करताच बस आगाराबाहेर काढली. या बस मधील सेंट्रल बेल्ट तुटलेल्या अवस्थेत होता. त्यामुळेच बसवर नियंत्रण मिळवणे अवघड होऊन दुचाकीला धडक बसली. काल रात्रीच छावणी पोलीस स्टेशन मध्ये बस चालक वाहकाला नेऊन पंचनामा करण्यात आला आहे. बसमधील प्रवासी आणि बाहेरील कुणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत पुढे खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या