बाल्कनीत टॉपलेस फोटोशूट; ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल

isha

मुंबई : बोल्ड फोटोशूटसाठी ओळखल्या जाणाऱ्यापैकी बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड फोटोंसाठी विशेष ओळखली जात असून नुकताच ईशाने असाच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ईशा गुप्ताने एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बाल्कनीत उभी असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे. या फोटोमध्ये सेमी न्यूड दिसत असून तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. या फोटोंवर आज को प्यार करो और कल को प्यार करो.’ असे दिले आहे. यामुळे ती ट्रोल झाली आहे.

यापूर्वी ईशाने बाथरुममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे ती चर्चेत होती. बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे बऱ्याचवेळा इशाला ट्रोल व्हावे लागते. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत तिने ट्रोलर्सला उत्तर दिले होते. तसेच २०२० या वर्षात मीच सगळ्यात जास्त ट्रोल झाली असेन असेदेखील तिने या मुलाखतीत म्हटले होते. ईशा ‘जन्नत २’, ‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’, ‘बादशाहो’ या सारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. तसंच नकाब या वेब सिरीजमध्ये तिने पोलीस अधिकारीची भूमिका केली. लवकरच ‘इनविजिबल वुमन’ या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या