‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’

वेबटीम : मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून ‘प्रॉब्लेम तुमचा ,सोल्युशन आमचं’ म्हणत या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रॉब्लेम सोडवायला सज्ज झाली आहे.
स्पृहा जोशी आणि गष्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून कोकणच्या विरोधात ठाकलेलं नागपूर या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. निर्मिती सावंत,विजय निकम,मंगल केंकरे,सतीश आळेकर,कमलेश सावंत,सीमा देशमुख, आदी मातब्बर मंडळींची साथ स्पृहा आणि गष्मीर ला लाभली आहे. दिगदर्शक विनोद लव्हेकर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून नात्यांमध्ये वाढत चाललेला दुरावा संवादातून कशा प्रकारे दूर केला जाऊ शकतो यावर भाष्य केले आहे.गुरू ठाकूर,वैभव जोशी यांनी चित्रपटासाठी गाणी लिहली असून बेला शेंडे,आनंदी जोशी,प्रियंका बर्वे, श्रुती आठवले,अभय जोधपूरकर, जसराज जोशी यांनी गाणी गायली आहेत.